फडफड फडकतो भगवा झेंडा
फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात ।
सर्वांग भरलं त्याचं न्हाला उभा रक्तात ।
हर हर महादेव त्याचा शब्द जाई कण्हण्यात
फडफड नाही त्याची तडफड घ्या रं ध्यानात
येड्या कोकरावाणी का रं भटकताय रानात
जर का नाही जागं झालात । झेंड्याला साथ ।
दिली नाही घात । ठेवलेलाच । रामा ।
हे रामा रं जी रं दाजी जी जी ॥
परंपरा त्याची वैभवशाली । अरुणाची लाली । जगावर आली । कोण लपवील ।
अभिमानास्पद इतिहास । जगी जन्मास । घालायला खास । शिवप्रभू आलं ।
रक्तमंथनात भगवा झेंडारूपी बाळरत्नं जन्माला आलं ।
जनतेनं प्राणयज्ञानं त्याला पोसलं ।
कॄष्णावाणी जन्म घेउनी । दीन दुबळ्यास्नी । अभयदान दिलं ।
वचनांची करुनी खैरात नाही फसविलं ।
पुढं होऊन पूर्ण स्वातंत्र्य मिळवुनी दिलं ।
आम्हां मराठ्यांचा महाराष्ट्र जगा शिकविलं ।
अजब अमृत जगी शिंपीलं । राष्ट्र मेलेलं । जिवंत त्यानं केलं ।
हे मर्दा रं जी रं दाजी जी जी ॥
बंगालच्या समुद्राला हादरा त्याचा बैसला ।
दर्शनासाठी तिष्ठतच बसली होती सिंधुमाय अटकेला ।
कटकेहून दौडला घोडा अटकेला गेला ।
अशी परंपरा ज्याची थोर । वक्त परि घोर आहे येणार । ऐका तुम्ही राजे ।
हो राजे हो जी रं दाजी जी जी ॥
अटकेला झेंडा लागला । होता पाहिला । आनंद होता झाला ।
आम्हा मराठ्यांस दोन बोटं स्वर्ग राहिला ।
अटकेहून आले आणि गेले थेट रंगमहालाला ।
ख्याली खुशालीत महाराष्ट्र दंग सारा झाला ।
रंगमहालात नवी बया भेटली त्याला ।
लावणीचा पाहून शिणगार । रुप तिचं न्यारं ।
झाला बहाद्दर । पुरा थंडगार । सांगू काय । राजे ।
हो राजे हो जी रं दाजी जी जी ॥
लावणीनं वाट दिली राजे फंदफितुरीला ।
इश्काच्या प्याल्यामधे महाराष्ट्र बुडविला ।
गुंग झाली स्वारी । रंग महाली । घुबडांनी संधी साधली ।
फितुरीची जाळी पसरली । करणीला फळं त्यांच्या आली ।
मर्कट सेना भोवताली । भगवा झेंडा ओढायला खाली ।
सज्ज तोफखान्यासह झाली ।
ही झोप तुम्हाला काळझोप ठरणारी ।
ही इश्कबाजी रौरवी तुम्हा नेणारी ।
इश्काची गाणी गाणारं । कालपातुर । लावणी रचणारं ।
विनवितो तुम्हा जाहीर । तोच शाहीर । या रं या सारं मैदानात । राजे ।
हो राजे हो जी रं दाजी जी जी ॥
मेढेकोट रक्ताचा झेंड्याभोवती उभा करा ।
रहा जिवंत नाहीतर लढता लढता मरा ।
ब्रीद मराठ्याचं जर असेल तेव्हा पुढं सरा ।
नाहीतर बांगड्या भरा न् खुशाल जा घरा ।
इथं सक्ती नाही कोणाला । मर्द एकला ।
मराठा राहिला शत्रुशी करीन मुकाबला ।
येऊ दे भला भला न् लावीन वाटेला ।
हो राजे हो जी रं दाजी जी जी ॥
एक एक मराठा गड-किल्ला भासेल ।
फंदफितुरीच्या मुळालाच सुरूंग ठासेल ।
सह्याद्री पुनरपि खदखदून हासेल ।
दरी-कपार जागतील नेत्री घालुनी तेल ।
अन् गनिमीकाव्याचा हिसका मग उमगेल ।
यावेळी मराठा कोण मागं राहील ।
इश्काचा प्याला तो फोडून फेकून देईल ।
राखील झेंड्याला देऊन प्राणाचे मोल ।
नव जोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल ।
आम्ही घालू नरडीला हात । ठरलेली बात ।
शत्रुचे दात । घशात घालणार । अन् आम्ही विजयी होणार ।
गात जाणार । मंत्र हर हर । गर्जा तुम्ही । राजे ।

गीत | - | शाहीर अमरशेख |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पंडितराव नगरकर, लता मंगेशकर, शाहीर अमरशेख |
चित्रपट | - | अमर भूपाळी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
मेढेकोट | - | लाकडाचा केलेला मजबूत तट. |
रौरव | - | नरक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.