फड सांभाळ तुर्याला ग
फड सांभाळ तुर्याला ग आला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला
तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्या राती राहिल कोण जागं?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन् गेला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा
मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला
तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्या राती राहिल कोण जागं?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन् गेला
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
चित्रपट | - | मल्हारी मार्तंड |
राग | - | कालिंगडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
आवतण | - | निमंत्रण, बोलावणे. |
कोल्हेकुई | - | कोल्ह्याचा आवाज. |
फड | - | शेत, मळा. |
बिघा | - | जमीन मोजण्याचे एक माप. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.