पावसा पावसा किती येशील
पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रानराणीला
आणखी कितीदा भिजवशील?
पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढून न्हालेले केस
बांधूं दे एकदा सैल अंबाडा
पावसा पावसा लप ढगांत
सागफुलांची कशिदा खडीची
घालूं दे तंगशी चोळी अंगात
पावसा पावसा ऊन पडूं दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसूं दे
पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणींत घालाया केला गजरा
पावसा पावसा आडोशांतून
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून !
आधीच ओलेत्या रानराणीला
आणखी कितीदा भिजवशील?
पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढून न्हालेले केस
बांधूं दे एकदा सैल अंबाडा
पावसा पावसा लप ढगांत
सागफुलांची कशिदा खडीची
घालूं दे तंगशी चोळी अंगात
पावसा पावसा ऊन पडूं दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसूं दे
पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणींत घालाया केला गजरा
पावसा पावसा आडोशांतून
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून !
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | देवकी पंडित |
गीत प्रकार | - | कविता, ऋतू बरवा |
कशिदा | - | वस्त्रावर केलेले वेलबुट्टीचे नक्षीकाम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.