पावना पुन्याचा आलाय् ग
पावना पुन्याचा आलाय् ग, बघून येडा झालाय् ग
सोळावं वरीस सरलंय् ग, माझं लगीन नुकतंच ठरलंय् ग
सकाळच्या पारी सांगावा आला, बघायला येतोय् आम्ही मुलीला
तिन्हीसांजंला पावना आला, बाई बघताच त्याला मी वरलंय् ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय् ग
भरदार छाती रुबाब मोठा, चोरून बघतोय् होईल बोभाटा
अंगावर माझ्या फुटलाय काटा, कळतात बरं का पुरुषाच्या वाटा
कसं काळीज त्याने चोरलंय् ग
माझं लगीन नुकतंच ठरलंय् ग
बघुन मला झाला हा येडा, ठरलाय् अमुचा साखरपुडा
आलाय् स्वप्नी ठसलाय् मनी त्याला इश्काच्या जाळ्यात घेरलंय् ग

गीत | - | मा. दा. देवकाते |
संगीत | - | विठ्ठल शिंदे |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | लावणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.