पाठमोरी मूर्ति तव ही
पाठमोरी मूर्ति तव ही पाहिली मीं कौतुकें
वाटलें त्वत्कुंतलीं गे गुंतलीं सारीं सुखें.
भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला
का फुलांच्या मार्दवें मानेवरी भारावला?
हा न झेला गे फुलांचा- लाजरी सौदामिनी
वाकुनीं केशीं तुझ्या लोकां खुणावी हासुनी.
पाठमोरी तू बिजेची रात्र, लावण्यें रमा
हासुनी पाहीं वळोनि, होउं दे ना पौर्णिमा.
वाटलें त्वत्कुंतलीं गे गुंतलीं सारीं सुखें.
भार त्यांचा गाढ काळा मेघ आषाढांतला
का फुलांच्या मार्दवें मानेवरी भारावला?
हा न झेला गे फुलांचा- लाजरी सौदामिनी
वाकुनीं केशीं तुझ्या लोकां खुणावी हासुनी.
पाठमोरी तू बिजेची रात्र, लावण्यें रमा
हासुनी पाहीं वळोनि, होउं दे ना पौर्णिमा.
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | किशोरी आमोणकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- २ मार्च १९४१. |
कुंतल | - | केस. |
झेला | - | गुच्छ / नक्षी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.