A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
परवशता पाश दैवें

परवशता पाश दैवें ज्याच्या गळां लागला ।
सजिवपणीं घडती सारे । मरण-भोग त्याला ॥

असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥

सौख्य-भोग इतरां सारे । कष्ट मात्र त्याला ॥

मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥