परब्रह्म भेटीलागी
परब्रह्म भेटीलागी धरेवरी आले
सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले
वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
चांदणे फुलांच्या ओठी फुलारून आले
तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व आत्मरूपी अवघे एकरूप झाले
सूर सूर चैतन्याचा रोम रोम झाले
वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
चांदणे फुलांच्या ओठी फुलारून आले
तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व आत्मरूपी अवघे एकरूप झाले
गीत | - | किशोर पाठक |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वराविष्कार | - | ∙ पं. जितेंद्र अभिषेकी ∙ शौनक अभिषेकी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | कधीतरी कोठेतरी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.