पाण्यातली परी मी
पाण्यातली परी मी, पाण्यातली परी मी
माझ्या मनातला मज लाभेल काय स्वामी
घे शोध राजहंसा माझ्या जरा प्रियाचा
तुझियापरी तयाचा तो डौल चालण्याचा
त्याच्यापुढे झुके नभ जाई नमून भूमी
त्याचे विशाल डोळे कमळा तुझ्याप्रमाणे
माझीच दिवस-रात्री ते पाहतात स्वप्ने
तुझियापरी तरंगा मज आवरे न ऊर्मी
नगरीस मज प्रियाच्या घेऊन जाइ नौके
मज शैशवातुनी तू दे यौवनात झोके
ये जवळ ये किनार्या होईन तव ऋणी मी
माझ्या मनातला मज लाभेल काय स्वामी
घे शोध राजहंसा माझ्या जरा प्रियाचा
तुझियापरी तयाचा तो डौल चालण्याचा
त्याच्यापुढे झुके नभ जाई नमून भूमी
त्याचे विशाल डोळे कमळा तुझ्याप्रमाणे
माझीच दिवस-रात्री ते पाहतात स्वप्ने
तुझियापरी तरंगा मज आवरे न ऊर्मी
नगरीस मज प्रियाच्या घेऊन जाइ नौके
मज शैशवातुनी तू दे यौवनात झोके
ये जवळ ये किनार्या होईन तव ऋणी मी
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
शैशव | - | बाल्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.