पाण्या निघाली सुंदरी
पाण्या निघाली सुंदरी । मन ठेवि दो घागरीं ।
चाले मोकळ्या पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥
वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी ।
दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें ॥२॥
चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं ।
वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥३॥
व्यभिचारिणी नारी । घरा श्रम करी ।
परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥४॥
तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं ।
लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥५॥
चाले मोकळ्या पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥
वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी ।
दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें ॥२॥
चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं ।
वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥३॥
व्यभिचारिणी नारी । घरा श्रम करी ।
परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥४॥
तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं ।
लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥५॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वर | - | स्नेहल भाटकर |
गीत प्रकार | - | संतवाणी |
नेदी | - | देत नाही. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.