पंख जेधवां फुटतील
पंख जेधवां फुटतील तेव्हा निर्भय तुम्ही व्हावे
आणि उद्याचे स्वप्न सुखाचे दिशांतुनी रेखावे
अंधारातून अडले पाऊल-
मुक्त करा, घ्या नवीन चाहूल
जा झेपावत दहा दिशांना क्षितिज दूर पळावे
अपुल्या पंखांमधली शक्ती
नको कुणाची त्यावर सक्ती
वादळातही मन हे तुमचे विचलित मुळी ना व्हावे
दिशाहीन ते नका भिरभिरू
मोह शोधण्या नकाच विहरू
या मातीचे या फांदीचे, स्मरण संगती न्यावे
आणि उद्याचे स्वप्न सुखाचे दिशांतुनी रेखावे
अंधारातून अडले पाऊल-
मुक्त करा, घ्या नवीन चाहूल
जा झेपावत दहा दिशांना क्षितिज दूर पळावे
अपुल्या पंखांमधली शक्ती
नको कुणाची त्यावर सक्ती
वादळातही मन हे तुमचे विचलित मुळी ना व्हावे
दिशाहीन ते नका भिरभिरू
मोह शोधण्या नकाच विहरू
या मातीचे या फांदीचे, स्मरण संगती न्यावे
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा. |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत, कल्पनेचा कुंचला |
जेधवा | - | जेव्हा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.