A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पंख हवे मज पोलादाचे

पंख हवे मज पोलादाचे
शूर लढाऊ जटायुचे

सीतेपरी जो हरण करोनी
असह्य अबला नेईल कोणी
काळझेप ती तिथे घालुनी
शील रक्षण्या स्त्रीजातीचे

निज जननीला मुक्त कराया
गरुड मागता अमृत देवा
तुच्छे हासता इंद्र तेधवा
वज्र तोडण्या त्या इंद्राचे

गर्भपिलांना सागर गिळता
क्रोधे उठली पक्षिण टिटवी
जळा पेटवी, सागर आटवी
अगस्तीच्या सामर्थ्याचे