पंढरीनाथा झडकरी आता
पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडून चला
विनविते रखुमाई विठ्ठला
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरी तुकयाचा
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला
धरणे धरुनी भेटीसाठी पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदु पूजक म्हणती केवळ आमुचा देव उरला
कलंक अपुल्या महानतेला बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
विक्रय | - | विक्री. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.