पंढरीची वारी जयाचिये
पंढरीची वारी जयाचिये कुळीं ।
त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणें त्रिभुवनीं होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीवावेगळा न करीं त्यांसी ॥३॥
नामा ह्मणे माझा सोयरा-जिवलग ।
सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥
त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणें त्रिभुवनीं होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीवावेगळा न करीं त्यांसी ॥३॥
नामा ह्मणे माझा सोयरा-जिवलग ।
सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥
गीत | - | संत नामदेव |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
चित्रपट | - | पंढरीची वारी |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल, चित्रगीत |
चार मुक्ती | - | सलोकता - समीपता - सरूपता - सायुज्यता. |
सरता | - | शेवटचा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.