पळभर थांब जरा रे विठू
आलो मी हितगूज कराया, जाउ नको रे विठू
पळभर थांब जरा रे विठू
असा येउनी भलत्या पारी
नको वाजवू पाऊल दारी
मायपित्याच्या सेवेमधुनी सांग कसा रे उठू?
कूस बदलुनी बाबा-आई
घेत विसावा अबोल होई
पाय चेपिता दोघांच्या पापण्या लागु दे मिटू
करिसी का माझ्याशी कावा?
तुझाच मी, तू माझा देवा
अंतर देऊ नको, नको रे मन अपुले पालटू
पळभर थांब जरा रे विठू
असा येउनी भलत्या पारी
नको वाजवू पाऊल दारी
मायपित्याच्या सेवेमधुनी सांग कसा रे उठू?
कूस बदलुनी बाबा-आई
घेत विसावा अबोल होई
पाय चेपिता दोघांच्या पापण्या लागु दे मिटू
करिसी का माझ्याशी कावा?
तुझाच मी, तू माझा देवा
अंतर देऊ नको, नको रे मन अपुले पालटू
गीत | - | अण्णा जोशी |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | सी. रामचंद्र |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
कावा | - | कारस्थान / लबाडी, ढोंग. |
हितगूज | - | हिताची गुप्त गोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.