पाहतोसी काय आता
पाहतोसी काय ।
आतां पुढें करीं पाय ॥१॥
वरि ठेवूं दे मस्तक ।
ठेलों जोडूनि हस्तक ॥२॥
बरवें करीं सम ।
नको भंगों देऊं प्रेम ॥३॥
तुका ह्मणे चला ।
पुढती सामोरे विठ्ठला ॥४॥
आतां पुढें करीं पाय ॥१॥
वरि ठेवूं दे मस्तक ।
ठेलों जोडूनि हस्तक ॥२॥
बरवें करीं सम ।
नको भंगों देऊं प्रेम ॥३॥
तुका ह्मणे चला ।
पुढती सामोरे विठ्ठला ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | किशोरी आमोणकर |
स्वर | - | किशोरी आमोणकर |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
ठेला | - | उभा राहिलेला / कुंठित. |
बरवा | - | सुंदर / छान. |
सम | - | सारखे, समान / तुल्य. |
भावार्थ-
- देवा पाहत काय राहिलास? आता तू आपले पाय पुढे कर ना.
- मी हात जोडून उभा आहे. तुझ्या पायावर मला माझे मस्तक ठेवू दे.
- तुझे प्रेम सारखे राहू दे. त्या प्रेमाचा भंग करू नको. सगळे चांगले कर.
- तुकाराम महाराज म्हणतात, चला, आपण सारे पुढे जाऊन विठ्ठलाच्या समोर उभे राहू.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.