A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पहा रे परमेशाची लीला

पहा रे परमेशाची लीला
जयें उभविली, नवलाईची जगन्‍नाट्य-शाला

वरती शोभे विशाल अंबर
बिनखांबांचा घुमट मनोहर
खाली हिरवीहिरवी चादर, सुंदर वनमाला

या गगनाच्या नील छतावर
चमकदार चंद्राचे झुंबर
कोटि कोटि तारका चमकती जणू दीपमाला