A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पडले स्वप्‍न पहाटेला

पडले स्वप्‍न पहाटेला
स्वप्‍नी बनुनी गौळण मी ग गेले यमुनेला

चार पावले वाट चालले
तोच मनातील हेतू फिटले
अवखळ हासत मोहन दिसला माझ्या नजरेला.. जाता यमुनेला

अवचित सारे त्याला कळले
आणि बोलता लबाड डोळे
धीटपणे ग मला इशारा त्यानीच ना केला.. जाता यमुनेला

लाजत पण मी गेले जवळी
दिव्य प्रीतिचे जीवन उजळी
बागच फुलली, नसती काटे माझ्या वाटेला.. जाता यमुनेला