ओवाळिते मी लाडक्या
ओवाळिते मी लाडक्या भाऊराया
चंद्र हा गगनी हासतो बघुनी
चांदणे शिंपुनी करी माया
दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली
कळस होउनी भाऊबीज आली
जन्मोजन्मी मिळू दे तिची छाया
डोळे दोन ज्योती, तेवती मंद मंद
ममता फुलवी जाईचा सुगंध
आतुरली पूजेला माझी काया
गुणी माझा भाऊ, याला ग काय मागू
हात जोडुनिया देवाजीला सांगू
औक्ष माझं वाहू दे त्याच्या पाया
चंद्र हा गगनी हासतो बघुनी
चांदणे शिंपुनी करी माया
दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली
कळस होउनी भाऊबीज आली
जन्मोजन्मी मिळू दे तिची छाया
डोळे दोन ज्योती, तेवती मंद मंद
ममता फुलवी जाईचा सुगंध
आतुरली पूजेला माझी काया
गुणी माझा भाऊ, याला ग काय मागू
हात जोडुनिया देवाजीला सांगू
औक्ष माझं वाहू दे त्याच्या पाया
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वराविष्कार | - | ∙ कु. शुभांगी ∙ आशा भोसले ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | ओवाळिते भाऊराया |
राग | - | भैरवी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.