A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नूपुर

जसे वाजती नूपुर सुखाचे
दु:खाचीही किणकिण असते
तोच आरसा असतो रे पण
छबी वेगळी उगाच दिसते

तसा एकटा असतो माणूस
सोबत असुनी सारे काही
ओंजळ दिसते भरलेली पण
ओंजळीत त्या काही नाही

तसा सरळही नसतो रस्ता
नशीबही नसते सरळ तसे
कळतही नाही ऋतुंसारखे
बदलत जाती दिवस कसे?

जसे वाजती नूपुर सुखाचे !