A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नेसते नेसते पैठणी चोळी ग

आले रे आले, रंगवाले !
होळी रे होळी, पुरणाची पोळी !!

नेसते, नेसते पैठणी-चोळी ग, आज होळी ग

मी राणी ग राजाची, नथ घालिते सर्जाची
वज्रटीक मोठ्या दर्जाची, मोहनमाळ ग मर्जीची
लाविते, लाविते कुंकू भाळी ग, आज होळी ग

बरी आलीया मावळण, लई गुणाची गवळण
तिनं दळीलं दळण अन्‌ सारविलं अंगण
काढिते, काढिते मी रांगोळी ग, आज होळी ग

भाऊ माझा आला पाहुणा, माझ्या परास त्यो देखणा
वहिनी संगं तान्हा ग, आनंद मनात मावंना
करिते, करिते पुरणपोळी ग, आज होळी ग

माझं माहेर कोकणाला, मला दिलीया दख्खनाला
होळी आई पाव नवसाला, आयुष्य मागते कांकणाला
पूजिते, पूजिते भक्ती भोळी ग, आज होळी ग