A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नील नभाची तप्त वेदना

नील नभाची तप्त वेदना लाल मुशीतून निथळत राही
बिंब होउनी क्षितिजावरती, धरणीवरती उतरून जाई

विशाल धरणी पसरुनी बाहू आग नभाची कवेत घेई
असह्य धग ती ऊरात घेऊन रक्तवर्ण सागरही होई

शांत शांत मग नभ नि धरणी, रात्र गारवा घेउनी येई
चंद्र चांदण्या शिंपून नभीच्या दाह धरेचा शमवित राही

शांत जरी हे सर्व रात्रभर, मनात दडपण घेऊन निजती
पोटामध्ये शूळास ठेवून प्रसव पहाटे देण्यासाठी

नभ-सागर नि धरणी मिळुनी तीच वेदना रोज झेलती
ही वेदनाच कारण जगण्याचे हे कठोर वास्तव तेही जाणती
गीत - मिलिंद गुणाजी
संगीत - कौशल इनामदार
स्वर- हंसिका अय्यर, संजीव चिम्मलगी
अल्बम - मन पाखराचे होई
गीत प्रकार - कविता

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  हंसिका अय्यर, संजीव चिम्मलगी