नील अंबरातुनी सावळी
नील अंबरातुनी सावळी निशा-परी
रंग सावळा-निळा शिंपिते जगावरी
दिव्य स्वप्नमोहिनी जोजवी चराचरां
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
तारका विसावल्या, चंद्रही नभांगणी
नीज ये समीरणा दाटल्या तमातुनी
चित्र वाटते जणू शांत ही वसुंधरा
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
झोपली कधीच ती पाखरे-कळ्या-फुले
बाल सौंगडी तुझे सर्व सर्व झोपले
धेनु झोपल्या सुखे, झोपवून वासरा
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
भागलास राजीवा खेळुनी कितीतरी
तेज पार लोपले सावळ्या मुखावरी
घेई झोपुनी कसा, वाजवी न घुंगुरा
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
रंग सावळा-निळा शिंपिते जगावरी
दिव्य स्वप्नमोहिनी जोजवी चराचरां
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
तारका विसावल्या, चंद्रही नभांगणी
नीज ये समीरणा दाटल्या तमातुनी
चित्र वाटते जणू शांत ही वसुंधरा
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
झोपली कधीच ती पाखरे-कळ्या-फुले
बाल सौंगडी तुझे सर्व सर्व झोपले
धेनु झोपल्या सुखे, झोपवून वासरा
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
भागलास राजीवा खेळुनी कितीतरी
तेज पार लोपले सावळ्या मुखावरी
घेई झोपुनी कसा, वाजवी न घुंगुरा
घे मिटून लोचने, नीज श्यामसुंदरा
गीत | - | हिराकांत कलगुटकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | उषा अत्रे-वाघ |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
समीरण | - | वायू. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.