नीज वो श्रीहरी चांद ये
नीज वो श्रीहरी चांद ये मोहरू
नंदराणी तुला गातसे हल्लरू
विहगगण झोपला, झोपी गेले तरू
वात हळुवारसा लागला वावरू
झोपली गाऊली, झोपले वासरू
नीज वो श्रीधरे, नीज वो सावळे
माझिया मांडिये स्वर्गसुख पेंगुळे
शांतरस त्यावरी घालते पांघरू
आणखी जपतपा काय मी आचरू
ब्रह्म ते माझिया पोटीचे लेकरू
आस मी कोणती आज चित्ती धरू
नंदराणी तुला गातसे हल्लरू
विहगगण झोपला, झोपी गेले तरू
वात हळुवारसा लागला वावरू
झोपली गाऊली, झोपले वासरू
नीज वो श्रीधरे, नीज वो सावळे
माझिया मांडिये स्वर्गसुख पेंगुळे
शांतरस त्यावरी घालते पांघरू
आणखी जपतपा काय मी आचरू
ब्रह्म ते माझिया पोटीचे लेकरू
आस मी कोणती आज चित्ती धरू
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, चित्रगीत |
विहंग | - | विहग, पक्षी. |
हल्लरू | - | गीत गाणे / अंगाई. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.