नयन तुझे जादुगार
नयन तुझे जादुगार
हरिणीचा हरिति नूर
त्यांत सुंदरी कशास
काजळ हें घालतेस?
साधाही नयन-बाण
विंधितसे काळजास
मग त्याला कां उगाच
कालकूट माखतेस?
हरिणीचा हरिति नूर
त्यांत सुंदरी कशास
काजळ हें घालतेस?
साधाही नयन-बाण
विंधितसे काळजास
मग त्याला कां उगाच
कालकूट माखतेस?
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | भालचंद्र पेंढारकर |
नाटक | - | पंडितराज जगन्नाथ |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी |
विंधणे | - | टोचणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.