नवल वर्तले गे माये
नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु
हास्यचि विलसे ओठी, अद्भुतचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु
पहाटली आशानगरी, डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु
चैत वार्याची वाहणी, आली देहाचे अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु
हास्यचि विलसे ओठी, अद्भुतचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु
पहाटली आशानगरी, डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु
चैत वार्याची वाहणी, आली देहाचे अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, मना तुझे मनोगत, चित्रगीत |
गोठी | - | गोष्ट. |
गोपुर | - | देवळाचे मुख्य दार. |
दिनेश | - | दिवसाचा अधिपती- सूर्य. |
रमेश | - | रमेचा पती- विष्णू. |
राऊळ | - | देऊळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.