नात्यास नाव अपुल्या
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
व्यवहारकोविदांचा होईल रोष, होवो
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
मंझिल की जयाची तारांगणात राही
सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
व्यवहारकोविदांचा होईल रोष, होवो
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
मंझिल की जयाची तारांगणात राही
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | अजित परब |
स्वराविष्कार | - | ∙ विभावरी आपटे-जोशी ∙ जयवंत कुलकर्णी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | नटसम्राट |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
टीप - • स्वर- विभावरी आपटे, संगीत- अजित परब. • स्वर- जयवंत कुलकर्णी, संगीत- ???. |
कोविद | - | तज्ज्ञ, विशारद. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.