नारदा मुनिवरा तुझे मी
नारदा मुनिवरा, तुझे मी गाता गौरवगीत
रंगले हरिभजनी संगीत
गळ्यांत वीणा चिपळ्या हाती
सदा वसे नारायण ओठी
अवतारुनी तू क्षणोक्षणी साधिसी जगाचे हीत
दोन खडावा पवित्र पायी
शिखा शिरी शोभे शुभदायी
कधी कुठे कळ लावुनी करिसी मति अमुची कुंठित
त्रिभुवनी तू रचुनी कावा
सत्कार्याते घेउनि धांवा
चराचरासी तारण्यास व्रतकैवल्ये दावीत
रंगले हरिभजनी संगीत
गळ्यांत वीणा चिपळ्या हाती
सदा वसे नारायण ओठी
अवतारुनी तू क्षणोक्षणी साधिसी जगाचे हीत
दोन खडावा पवित्र पायी
शिखा शिरी शोभे शुभदायी
कधी कुठे कळ लावुनी करिसी मति अमुची कुंठित
त्रिभुवनी तू रचुनी कावा
सत्कार्याते घेउनि धांवा
चराचरासी तारण्यास व्रतकैवल्ये दावीत
गीत | - | अण्णा जोशी |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | सुधीर फडके |
गीत प्रकार | - | भावगीत |
कावा | - | कारस्थान / लबाडी, ढोंग. |
खडावा | - | लाकडी चपला. |
मति | - | बुद्धी / विचार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.