A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नामें अनंत रूपें अनंत

नामें अनंत रूपें अनंत, व्यापी दिगंतराला
ना ठाव येथ ना ठाव तेथ, जाणीव अंतराला

जे दु:खात त्यांच्यासाठी
जो जे वाहत येतो हाती
पर चिंतेचा भार वाहुनी
उरतो केवळ दुज्याचसाठी
जो दुबळ्यांचा चाकर बनला, तो ईश्वर झाला

श्रावणधारा होऊन येतो
जो दीनांच्या व्याकूळ ओठी
जो स्‍नेहाने उजळून देतो
क्षीण कुणाची जीवनज्योती
त्याचे जीवन झाले पावन, जो प्रभुचा झाला