नको प्रिया छेड काढू
नको प्रिया छेड काढू, नको मला ओढू
माझ्या अंतरीचे नको सूर छेडू
अनामिक ओढ माझ्या मनामध्ये जागे
तुला पुन्हा भेटायाची हुरहुर लागे
तुझ्या रेशमी बंधांनी अशी नकोनको प्रित जोडू
फुलायाची हौस नाही, कळी गोड वाटे
स्वप्न एक मंतरलेले लोचनांत दाटे
प्रिया खेळ हा रंगला असा नकोनको खंड पाडू
माझ्या अंतरीचे नको सूर छेडू
अनामिक ओढ माझ्या मनामध्ये जागे
तुला पुन्हा भेटायाची हुरहुर लागे
तुझ्या रेशमी बंधांनी अशी नकोनको प्रित जोडू
फुलायाची हौस नाही, कळी गोड वाटे
स्वप्न एक मंतरलेले लोचनांत दाटे
प्रिया खेळ हा रंगला असा नकोनको खंड पाडू
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | दिलराज कौर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.