नको भव्य वाडा
नको भव्य वाडा, नको गाडी-घोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी
तुला या दिलाची येईल कसोटी
बेहोश मन हे, तुझा त्यास ओढा
मला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा
किती काळ सोसू उरी मी निराशा
बेचैन हृदया तू दे धीर थोडा
अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा
तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी
तुला या दिलाची येईल कसोटी
बेहोश मन हे, तुझा त्यास ओढा
मला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा
किती काळ सोसू उरी मी निराशा
बेचैन हृदया तू दे धीर थोडा
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | महंमद रफी |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.