A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नका तोडू पावणं जरा

डेरेदार बहरलं झाड, लागला पाड
पानाच्या आड खुणवतो आंबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं
टकमक टकमक बघू नका हो
मागं मागं लागू नका

भलत्याच गोष्टी करू नका
नका तोडू पावणं जरा थांबा

वाण अस्सल, तांबूस पिवळा
टचटचून रसानं भरला
हिरवट गोडी, आंबट थोडी
सालीत मऊमऊ गाभा
नका तोडू, पावणं जरा थांबा

भार देठाला सोसत न्हाई
आली झुळुक हेलकावा खाई
नजरा सावरा थोडक्यात आवरा
कईकांनी धरला दबा
नका तोडू, पावणं जरा थांबा