नाहीं झाले षण्मास मला
नाहीं झाले षण्मास मला राज्य सोडुनी ।
तोंच विपरित हें काय ऐकण्यांत ये जनीं ॥
काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो ।
काय देवकिचा तनय कृष्ण वचन मोडितो ।
काय हलधर नवरत्न मर्कटासि अर्पितो ।
नवल हेंचि मन्मनीं ॥
तोंच विपरित हें काय ऐकण्यांत ये जनीं ॥
काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो ।
काय देवकिचा तनय कृष्ण वचन मोडितो ।
काय हलधर नवरत्न मर्कटासि अर्पितो ।
नवल हेंचि मन्मनीं ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वर | - | |
नाटक | - | सौभद्र |
राग | - | झिंझोटी |
ताल | - | त्रिताल |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
तनय | - | पुत्र. (तनया- पुत्री). |
हलधर | - | श्रीकृष्णाच्या मोठ्या भावाचे, बलरामाचे दुसरे नाव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.