नाही गडे कुणाशी माझे
नाही गडे कुणाशी माझे जगात नाते
पाऊलवाट माझी दारी तुझ्याच येते !
नाही म्हणू नको ग, उघडी सखी कवाडा
दारी उभा कधीचा मी एक प्रेमवेडा !
झिडकारिले कितीदा पीडा फिरून आली
माझा गुन्हा असे हा, फिर्याद मीच केली
कर न्यायदेवते तू येऊनिया निवाडा !
बंधाविना सुटेना ही खोड जन्मजात
भोगीन मी सजा ती तव दृष्टिच्या गजांत
होता सजा हवी ती, हा संपला बखेडा !
दावी दया जराशी, मजसी कधी न सोडी
घालून ठेव पायी भरघोस लग्नबेडी
आणि पुन्हा कधी तू उघडू नको कवाडा !
पाऊलवाट माझी दारी तुझ्याच येते !
नाही म्हणू नको ग, उघडी सखी कवाडा
दारी उभा कधीचा मी एक प्रेमवेडा !
झिडकारिले कितीदा पीडा फिरून आली
माझा गुन्हा असे हा, फिर्याद मीच केली
कर न्यायदेवते तू येऊनिया निवाडा !
बंधाविना सुटेना ही खोड जन्मजात
भोगीन मी सजा ती तव दृष्टिच्या गजांत
होता सजा हवी ती, हा संपला बखेडा !
दावी दया जराशी, मजसी कधी न सोडी
घालून ठेव पायी भरघोस लग्नबेडी
आणि पुन्हा कधी तू उघडू नको कवाडा !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | पोस्टातली मुलगी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कवाड | - | दरवाजाची फळी, दरवाजा. |
बखेडा | - | वाद, भांडण. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.