नाचुनी तुझ्यापुढे मागते
नाचुनी तुझ्यापुढे मागते मुशाहिरा
प्रीतभाव जाणशी तूच प्रीत-शाहिरा
धुंद मी कलावती मी कुणा न मोजिले
ठाकता तुझ्यापुढे का उगाची लाजले
पापण्या जडावती, सूर होई कापरा
जाणकार तू सख्या नामवंत पारखी
सांगणेच संपले सांगू काय आणखी
सद्गुणात कोंदणी बैसवी तुझा हिरा
प्रीतभाव जाणशी तूच प्रीत-शाहिरा
धुंद मी कलावती मी कुणा न मोजिले
ठाकता तुझ्यापुढे का उगाची लाजले
पापण्या जडावती, सूर होई कापरा
जाणकार तू सख्या नामवंत पारखी
सांगणेच संपले सांगू काय आणखी
सद्गुणात कोंदणी बैसवी तुझा हिरा
कोंदण | - | दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण. |
मुशाहिरा | - | पगार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.