नभी चांद आला
नभी चांद आला
चांदण्यांचा रास अंगी मोहरून आला
गोकुळीच्या बासरीची मंद धून आली
एक वेडी चंद्रबाधा सावल्यांना झाली
पुष्पिताना या लतांनी गुंफिल्या माला
पावलांना पैंजणाचे भास वेढू आले
आसमंती रास रंगे श्वास व्याकूळ झाले
झेलुनी घे रे फुलांचा धुंद हा झेला
आज माझी गौरकांती चांदण्यास आली
सावळ्याच्या नीलरंगी रात गर्द झाली
प्रेमवेड्या राधिकेच्या श्याम अंगी आला
चांदण्यांचा रास अंगी मोहरून आला
गोकुळीच्या बासरीची मंद धून आली
एक वेडी चंद्रबाधा सावल्यांना झाली
पुष्पिताना या लतांनी गुंफिल्या माला
पावलांना पैंजणाचे भास वेढू आले
आसमंती रास रंगे श्वास व्याकूळ झाले
झेलुनी घे रे फुलांचा धुंद हा झेला
आज माझी गौरकांती चांदण्यास आली
सावळ्याच्या नीलरंगी रात गर्द झाली
प्रेमवेड्या राधिकेच्या श्याम अंगी आला
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | रवींद्र साठे, रंजना जोगळेकर |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, हे श्यामसुंदर, युगुलगीत, भावगीत |
झेला | - | गुच्छ / नक्षी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.