मुशाफिरा ही दुनिया सारी
मुशाफिरा ही दुनिया सारी घडीभराची वस्ती रे
नसे महाली ख्याली खुशाली, ती तर रस्तोरस्ती रे
लावू नको रे हात कपाळी, तुझी रिकामी राहील झोळी
सुखदुःखाशी हसून खेळून मुशाफिरा कर दोस्ती रे
रोख आजला, उद्या उधारी, ऐसी भैया दुनियादारी
कधी गिरस्ती कधी फिरस्ती, झूट धनाची मस्ती रे
आज अमिरी, उद्या फकिरी, कुठेही भैया टाक पथारी
आलास नंगा, जाशील नंगा, तुझी खुदाला धास्ती रे

गीत | - | बाबुराव गोखले |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे, अलका |
चित्रपट | - | जागा भाड्याने देणे आहे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.