मुक्या कळीला फुटले
मुक्या कळीला फुटले हासू, फूल उमलले देठीं ग
मनोगतांची झाली गीते, सूर तरळले ओठीं ग
वसंतवारे भरले देही, रंग दाटले गंधात
फूलपाखरू एक गवसले गूढ अनामिक छंदात
झुलत राहिले फुलाभोवती नव्या ओळखीसाठी ग
फूल लाजते हसते रुसते, उगाच लटक्या रोषात
मुक्या पाकळ्या मिटून घेती सुगंध अपुल्या कोषात
फूलपाखरू खुळावलेले फिरते पाठीपुढती ग
किती लपविले जरी फुलाने, गूज लपावे कुठले ग
फूलपाखरू फुलास शिवता, दुरावलेपण फिटले ग
मृदुल कोवळे धागे जुळले, बसल्या रेशिमगाठी ग
मनोगतांची झाली गीते, सूर तरळले ओठीं ग
वसंतवारे भरले देही, रंग दाटले गंधात
फूलपाखरू एक गवसले गूढ अनामिक छंदात
झुलत राहिले फुलाभोवती नव्या ओळखीसाठी ग
फूल लाजते हसते रुसते, उगाच लटक्या रोषात
मुक्या पाकळ्या मिटून घेती सुगंध अपुल्या कोषात
फूलपाखरू खुळावलेले फिरते पाठीपुढती ग
किती लपविले जरी फुलाने, गूज लपावे कुठले ग
फूलपाखरू फुलास शिवता, दुरावलेपण फिटले ग
मृदुल कोवळे धागे जुळले, बसल्या रेशिमगाठी ग
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.