मोठं मोठं डोळं तुझं
मोठं मोठं डोळं
तुझं कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाय् रं
नको दावू धाक
मला, डोळं तुझं झाक
आल्यागेल्या भुलतील, मी भुलायची नाय् रं
लाडीगोडी सोड
भारी बोलणं तुझं गोड
सवालाला जबाब मी देणार नाय् रं
असशिल मोठा नाग
तर केवड्याखाली वाग
गुलाबाचा गेंद तुला लाभायचा नाय् रं
शिकारीची हाव
तुला, हरिणीमागं धाव
रानांतली साळू तुला मिळायची नाय् रं
पुरे तुझी ऐट
माझ्या बापाला भेट
लगीन झाल्याबगार मी बधायची नाय् रं
तुझं कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाय् रं
नको दावू धाक
मला, डोळं तुझं झाक
आल्यागेल्या भुलतील, मी भुलायची नाय् रं
लाडीगोडी सोड
भारी बोलणं तुझं गोड
सवालाला जबाब मी देणार नाय् रं
असशिल मोठा नाग
तर केवड्याखाली वाग
गुलाबाचा गेंद तुला लाभायचा नाय् रं
शिकारीची हाव
तुला, हरिणीमागं धाव
रानांतली साळू तुला मिळायची नाय् रं
पुरे तुझी ऐट
माझ्या बापाला भेट
लगीन झाल्याबगार मी बधायची नाय् रं
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | ललिता फडके |
चित्रपट | - | जशास तसें |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी, नयनांच्या कोंदणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.