मी मजवर भुलले बाई
मी मजवर भुलले बाई
भाव बोलती माझ्यासंगे, प्रीती अबोल राही
मनातले मन होई जागे
कळला हेतू, जुळले धागे
खुळी सावली माझ्या मागे, मलाच पुसते काही
नको विचारू कमळफुला रे
सांगितल्याविण कळे तुला रे
तरंग उठता येत शहारे कोमल माझ्या देही
स्वप्न रेखिता गोजिरवाणे
मला खुणविती डोंगर-राने
संसाराचे मंजुळ गाणे नकळत ओठी येई
भाव बोलती माझ्यासंगे, प्रीती अबोल राही
मनातले मन होई जागे
कळला हेतू, जुळले धागे
खुळी सावली माझ्या मागे, मलाच पुसते काही
नको विचारू कमळफुला रे
सांगितल्याविण कळे तुला रे
तरंग उठता येत शहारे कोमल माझ्या देही
स्वप्न रेखिता गोजिरवाणे
मला खुणविती डोंगर-राने
संसाराचे मंजुळ गाणे नकळत ओठी येई
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | ईर्षा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.