मी जलवंती मी फुलवंती
मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागंल मला
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात जाईजुईच्या फुला रं
मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागंल मला
थांब जरा तिथं
लाज वाटती !
काय म्हणू तिला?
ती हाय पिरती !
तुझ्या रूपाचं रूपाचं डोळ्यात हासू फुटं
तुझ्या संगतीनं संगतीनं उमलून पाकळी मिटं
रुसावं-हसावं उगीच फसावं, कुठं ही शिकलीस कला?
या पावसात झाले ओलेचिंब, गोर्या गाली मोतियाचे थेंब
दोघांत निवांत मिळाला एकान्त, भेटीचा मोका आला

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, शैलेंद्र सींग |
चित्रपट | - | नांव मोठं लक्षण खोटं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.