मी इथे तू तिथे
मी इथे, तू तिथे, ढाळितो आसवे
का तुझ्या लोचना प्रीत ना आठवे?
दुर्दैवाच्या रातीला मीच अभागी झाले रे
देह कलंकित घेउनी दूर अशी मी गेले रे
दूरता ही तुझी ना मला साहवे !
सोडुनी जाता तू मला, हाय ! सुने घर जाहले
रूप तुझे ते पाहुनी आज नयनही नाहले
साजणा जीवनी शून्यता जाणवे
आज अचानक भेटता, प्राण अधिर हे झाले रे
फूल असे मज पाहुनी कोमेजून का गेले रे?
वाळले फूल हे पूजनी का हवे?
का तुझ्या लोचना प्रीत ना आठवे?
दुर्दैवाच्या रातीला मीच अभागी झाले रे
देह कलंकित घेउनी दूर अशी मी गेले रे
दूरता ही तुझी ना मला साहवे !
सोडुनी जाता तू मला, हाय ! सुने घर जाहले
रूप तुझे ते पाहुनी आज नयनही नाहले
साजणा जीवनी शून्यता जाणवे
आज अचानक भेटता, प्राण अधिर हे झाले रे
फूल असे मज पाहुनी कोमेजून का गेले रे?
वाळले फूल हे पूजनी का हवे?
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, भूपेंद्र |
चित्रपट | - | पैजेचा विडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.