मीही सुंदर तूही सुंदर (१)
मीही सुंदर तूही सुंदर
आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर नभ हे सुंदर
जे जे दिसते ते ते सुंदर
निळेभोर हे आभाळ मोकळे
रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले
अमृतरसाचे सांडती पाझर
धाव राधिके धाव लौकरी
अनंतामध्ये मारू भरारी
आनंदाचे तुफान उठले
सर्वांगाला पंख उगवले
सुंदरतेचा पहा उसळला
जिकडेतिकडे अथांग सागर
आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर नभ हे सुंदर
जे जे दिसते ते ते सुंदर
निळेभोर हे आभाळ मोकळे
रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले
अमृतरसाचे सांडती पाझर
धाव राधिके धाव लौकरी
अनंतामध्ये मारू भरारी
आनंदाचे तुफान उठले
सर्वांगाला पंख उगवले
सुंदरतेचा पहा उसळला
जिकडेतिकडे अथांग सागर
गीत | - | प्र. के. अत्रे |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | पं. उदयराज गोडबोले |
नाटक | - | अशी बायको हवी ! |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.