मी एक तुला फूल दिले
मी एक तुला फूल दिले सहज नकळता
त्या गंधातून मोहरली माझी कविता !
त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता !
हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता !
का पान फूल लज्जेने चूर जाहले?
का सळसळत्या वार्याचे नूपुर वाजले?
त्या नूपुरांचे किण किण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता !
बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातून मोहरली माझी कविता !
त्या गंधातून मोहरली माझी कविता !
त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता !
हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता !
का पान फूल लज्जेने चूर जाहले?
का सळसळत्या वार्याचे नूपुर वाजले?
त्या नूपुरांचे किण किण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता !
बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवितसे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातून मोहरली माझी कविता !
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
कनक | - | सोने. |
झरणी | - | ज्यात द्रवरूप शाई भरलेली असते आणि ती निबेतून झरेल अशी व्यवस्था केलेली असते ती एक प्रकारची लेखणी (फाउंटेन पेन). |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.