मी चालले रं शेताला
मी चालले रं शेताला, शेताला
सार्या वर्साची दौलत राखायाला
दिस आलाया डोंगरमाथ्याला
गुरं गेल्याती राखुळीला
शेत नाही कुणी राखाया
माझ्याविना, मी चालले रं शेताला, शेताला
मोट गातिया तथं, कुंई कुंई गानी
चंद्या-नंद्याचं थुई थुई नाचनं
मुरलीवानी,
धावतंय झुळुझुळु पाणी पाटाचं
माझ्या शेताला, सोनेरी शेताला
मी चालले रं शेताला, शेताला
सार्या वर्साची दौलत राखायाला
दिस आलाया डोंगरमाथ्याला
गुरं गेल्याती राखुळीला
शेत नाही कुणी राखाया
माझ्याविना, मी चालले रं शेताला, शेताला
मोट गातिया तथं, कुंई कुंई गानी
चंद्या-नंद्याचं थुई थुई नाचनं
मुरलीवानी,
धावतंय झुळुझुळु पाणी पाटाचं
माझ्या शेताला, सोनेरी शेताला
मी चालले रं शेताला, शेताला
गीत | - | दत्ता डावजेकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | लता राव |
गीत प्रकार | - | भावगीत |
मोट | - | विहिरीतून पाणी काढण्याचे मोठे पात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.