मी अशी ही बांधलेली
मी अशी ही बांधलेली, मी कशी स्वप्नात येऊ?
या तुझ्या गीतास वेड्या मी कशी स्वरसाज देऊ?
हे असे भिजतात डोळे, तू नको स्वप्नात येऊ
मदिर हळवी गीत-सुमने माझिया केसात खोवू
त्या सुखाने भारलेला गंध कैसा सांग लेवू?
रीतीच्या जड शृखलांनी पाय हे बांधून घेते
अन् स्वरांच्या कंपनांना काळजाची साथ देते
काजळी रात्रीत कुठवर लोचनांचे दीप लावू?
या तुझ्या गीतास वेड्या मी कशी स्वरसाज देऊ?
हे असे भिजतात डोळे, तू नको स्वप्नात येऊ
मदिर हळवी गीत-सुमने माझिया केसात खोवू
त्या सुखाने भारलेला गंध कैसा सांग लेवू?
रीतीच्या जड शृखलांनी पाय हे बांधून घेते
अन् स्वरांच्या कंपनांना काळजाची साथ देते
काजळी रात्रीत कुठवर लोचनांचे दीप लावू?
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |
मदिर | - | धुंद करणारा. |
सुमन | - | फूल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.