मी असा कसा वेगळा
पत्त्यामधले राजे आम्ही, केवळ मी निराळा !
मी असा कसा वेगळा?
इस्पिक राजा दिमाखदार
किलवर नाजुक नक्षीदार
बदाम गोंडस अन् दिलदार
नजर जगाची चुकवित फिरतो, मीच एक बावळा !
चौकटीत मी घुसमटलेला
तुमच्याहुन मी जरी निराळा
तरीही तुमचा, तुमच्यामधला
माझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा !
मी असा कसा वेगळा?
इस्पिक राजा दिमाखदार
किलवर नाजुक नक्षीदार
बदाम गोंडस अन् दिलदार
नजर जगाची चुकवित फिरतो, मीच एक बावळा !
चौकटीत मी घुसमटलेला
तुमच्याहुन मी जरी निराळा
तरीही तुमचा, तुमच्यामधला
माझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा !
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ |
चित्रपट | - | चौकट राजा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.