A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माया जळली कां

माया जळली कां । तिळही ममता नाहीं कां ।
आली पोटीं पोर एकटी, तीही विकितां कां ॥

लाजहि गेली कां । मतिला भ्रमही पडला कां ।
शोभा करितील लोक तयाची, चाडहि नाहीं कां ॥

द्रव्यचि बघतां कां । तिजला पतिसुख नलगे कां ।
वृद्धा देउनि तिला वांझपण, विकतचि घेतां कां ॥