A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मथुरेला कृष्ण निघाला

मथुरेला कृष्ण निघाला, कंस भेटीला
दु:ख काळजाला, सार्‍या गोकुळा

यशोदेस वाटे चिंता
दृष्ट झाली या भगवंता
कंस तुला लावील बाळा दुष्ट सापळा

जवळ जाऊनिया माता
लडिवाळ कुरवाळिता
माउलीस समजावितो, श्याम सावळा