A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मथुरेच्या बाजारी

दहीदुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई
मथुरेच्या बाजारी,
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?

नटखट भारी किस्‍नमुरारी टपला यमुनातीरी
करतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई
मथुरेच्या बाजारी,
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?

नकोस फोडू कान्हा माझी घागर आज रिकामी
हसेल सारी गोकुळ नगरी होईल रं बदनामी
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
रितीच घागर नशीबी माझ्या, शरण तुला मी आले
देवा शरण तुला मी आले

वाट अडवून हसतो गाली ग वेणु ऐकुन मोहित झाले
भान हरपून रमती गोपिका, श्यामरंगी न्हाऊन गेले
मन भुलवी असा कान्हा झुलवी असा हा नटनागर गिरिधारी
त्याच्या संग दंगले, रास रंगले, पिरतीची रीत न्यारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर- अजय गोगावले, बेला शेंडे
चित्रपट - नटरंग
गीत प्रकार - चित्रगीत, हे श्यामसुंदर, लावणी
वेणु - बासरी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अजय गोगावले, बेला शेंडे