मनोरथा चल त्या नगरीला
मनोरथा, चल त्या नगरीला
भूलोकीच्या अमरावतीला
स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी
सडे शिंपिले चंद्रकरांनी
शीतळ वारा सारथी होउनि
अयोध्येच्या नेई दिशेला !
सर्व सुखांचा मेघ सावळा
रघुनंदन मी पाहीन डोळां
दोन करांची करुनी मेखला
वाहीन माझ्या देवाला !
भूलोकीच्या अमरावतीला
स्वप्नमार्ग हा नटे फुलांनी
सडे शिंपिले चंद्रकरांनी
शीतळ वारा सारथी होउनि
अयोध्येच्या नेई दिशेला !
सर्व सुखांचा मेघ सावळा
रघुनंदन मी पाहीन डोळां
दोन करांची करुनी मेखला
वाहीन माझ्या देवाला !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | मालती पांडे |
चित्रपट | - | सीता स्वयंवर |
गीत प्रकार | - | राम निरंजन, मना तुझे मनोगत, चित्रगीत |
अमरावती | - | इंद्रनगरी. |
मेखला | - | कमरपट्टा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.